शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोहोपाडा, रिस परिसरात कोरोनाचा फैलाव वेगाने; २५१ सक्रिय रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:03 IST

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांचा मुक्तसंचार 

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांसमोर बेड शिल्लक नसून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिक तरीदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तसंचार करताना दिसत आहेत. नागरिकांचा हा बिनधास्तपणा त्यांच्या जिवावर बेतू शकतो. याकरिता सर्वांनी शासन आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती. यावेळी नागरिकांनी शासन आदेशाचे पालन करून कोरोनाला हरविले होते. तसेच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेवर विजय मिळवावा. वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढतच आहे. सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात २३ एप्रिलपर्यंत एकूण २५१ रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१४ झाली आहे. यात कोरोनावर ५३० जणांनी मात केली आहे, तर ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने होत आहे. मात्र आणखी देखिल नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

चौक मंडलात १,४४५ कोरोनाबाधित रुग्णn१७ एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण १४४५ रुग्णसंख्या असून एकूण ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरू केले आहे तर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लस घेता येणार असल्याने सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. nकोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावा, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा जास्त वापर करावा, असे आवाहन वासांबे मोहोपाडाग्रामपंचायत आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या