शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रणगाडा अलिबागमध्ये दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:51 IST

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार गती

`1 लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळावी तसेच अलिबागचे ऐतिहासिक महत्त्व अधाेरेखित व्हावे यासाठी अलिबागच्या मुख्य समद्रकिनारी युद्धात शाैर्य गाजवलेला रणगाडा ठेवण्यात आला आहे. पुणे-खडकी येथील लष्करी कॅम्पमधून शुक्रवारी सकाळीच हा रणगाडा येथे दाखल झाला आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लाेकमत’ला दिली.‘लाेकमत’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा अनाेखा देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी मान्य केली. ती मान्य हाेऊन शुक्रवारी रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे अलिबागमधील नव्हेतर, तमाम रायगडकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. अलिबागला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे या पराक्रमी महान विभूतीचा इतिहास लाभलेला आहे. त्याचा फायदा पर्यटन वृद्धीसाठी निश्चितच हाेईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा कार्यक्रम ‘लाेकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित करण्यात आला हाेता. तरुणाईला संरक्षण दलात जाता यावे तसेच अलिबागच्या प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तिथे रणगाडा बसविण्याची संकल्पना मनात आली हाेती. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे.    - डाॅ. विजय सूर्यवंशी, तत्कालीन जिल्हाधिकारी

उच्च दर्जाचे सुशाेभीकरण nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यासाठी विशिष्ट जागा केली आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे सुशाेभीकरण करण्यात येणार आहे. nतसेच रणगाड्याची अप्रतिम अशी रंगरंगाेटीही करण्यात येणार आहे. यासाठी दाेन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२१ रोजी रणगाड्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ताे स्थानिकांसह पर्यटकांच्या आर्कषणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती येणार आहे.