शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात २४ तासात ७३६ मिमी पाऊस

By admin | Updated: June 25, 2017 15:13 IST

रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका

 जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत

अलिबाग, दि. 25 - रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका नदिच्या जलपातळीत वाढ होवून, जलपातळी पूर रेषेकडे झेपाऊ लागल्याने दोन्ही नदि किनारच्या एकूण १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा ईषार देण्यात आला असल्याची माहिता रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदिची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्या जवळ ८ मिटर या पूररेषे पेक्षा वाढून ८.५० मिटर झाली आहे.तर कुंडलिका नदिची जलपातळी रोहा येथे २३.९० मिटर झाली आहे. कुडलिका नदिची रोहा येथील पूर सिमा २३.९५ मिटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पाश्वर्भूमीवर रोहा तहसिलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी पूढे सांगीतले.दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात जिल्ह्यात १७७.८० मिमी अशा सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत येथे झाली आहे. जिल्हयात उर्वरित ठिकाणी पनवेल- १०५, अलिबाग-०२, पेण-१९.२०, मुरुड-०६, उरण-६.५०, खालापूर-५२, माणगांव-३३, रोहा-३३, सुधागड-४०, तळा-११, महाड-३५, पोलादपूर-३६,म्हसळा-२६.२०, श्रीवर्धन-१०, आणि गिरीस्थान माथेरान येथे १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४६.०१ मिमी आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्या पासून पूढील २४ तासात संपर्ण कोकणात अतिवृष्टीचा ईषारा हवामान खात्याने दिला आहे.तर सोमवार २६ जून २०१७ रोजी सकाळी नऊ वाजल्या पासून पूढील १२० तासात कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनूसरुन जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगीतले.