शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: September 11, 2015 23:38 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

कर्जत : यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भात शेती सुकू लागली होती त्यातच पावसाअभावी विविध रोगांचा प्रादुर्भाव भातपिकावर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पीक वाचावे म्हणून नदी, नाल्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पंप लावून शेतात पाणी घेण्याचा निर्णय घेतला. शेते पाण्याने भरली अन् वरु णराजाने कृपा केल्याने शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.यावर्षी पावसाने सर्वांनाच रडविले. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात भातपीक चांगले आले असताना पावसाने दांडी मारली भातपिके सुकू लागली. विविध रोगांनी पिकाला पछाडण्यास सुरु वात झाली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावले. गणपतीचा सण जवळ आला तरी त्याला काही सुचत नव्हते. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाल्यालगत असलेल्या भात शेतीला पंप लावून पाणी दिले व शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु हे सधन शेतकऱ्याला जमले व ज्यांची शेती नदी, नाल्यांच्या जवळ आहे त्यांचा फायदा होत होता. अन्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. राजानाला विभागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार ठेवले होते. पंपाने पाणी घेऊन शेते भरली आणि पावसाने सुरु वात केल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर) एसआरटी पद्धतीने केलेले भातपीक पंधरा दिवसांपूर्वी दृष्ट लागण्यासारखे होते मात्र पावसाच्या अभावी पिके सुकू लागली म्हणून आम्ही नाल्यामधील पाणी पंप लावून शेतात घेतल्याने पिकात पुन्हा जीव आला. त्यातच परतीच्या का होईना पावसाने सर्वांनाच तूर्तास तारले आहे.- हरिश्चंद्र ठोंबरे,शेतकरी, कोषाणे