शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; भिरा धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा पावसाने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिरा धरण तुडुंब भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे डोलवहाळ बंधाºयातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा धुमधडाका हा असाच पुढील तीन दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने जनजीवन पुरते विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती, मात्र रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री सोसाट्यांच्या वाºयासह पाऊस पडत होता. सोमवारी दुपारपर्यंत संततधार सुरू होती.

रविवारपासून बरसणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी, अंबा नदी तसेच महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.भिरा धरणाने इशारा पातळी ओलांडल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्या दरवाजातून १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गाव वाड्यांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटीलपासून उच्च अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.महाड : गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातून वाहणाºया सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नद्यांचे पाणी महाड शहरात घुसले. यामुळे शहरातील सखल भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावित्री व गांधारी नद्यांची पातळी वाढल्याने पुराचे पाणी दस्तूरी मार्ग , अर्जुन भोई मार्ग तसेच गांधारी मार्ग, क्रांती स्तंभ मार्ग पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांनी सामानाची आवराआवर करण्याची लगबग सुरू होती.महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरीक्षक किशोर शिंदे आदींनी भोईघाट परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. महाड नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. शहर व तालुक्यातील नदीकिनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारी रात्रभर महाबळेश्वर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीत सोमवारी अचानक वाढ झाली त्यामुळे शहर परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पूरस्थितीमुळे सोमवारी दुपारनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.