शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

रायगडची एचआयव्हीमुक्तीकडे वाटचाल; रुग्णांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:41 IST

जिल्ह्यात ४१७ एचआयव्ही संसर्गित रुग्ण

- निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ४१७ (०.६८ टक्के) एचआयव्ही संसर्गित रुग्ण होते. नोव्हेंबर, २०२० पर्यंत हीच संख्या अवघ्या १६० (०.३ टक्के) वर येऊन ठेपली आहे. या घटत्या आकडेवारीवरून रायगडची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची, एचआयव्ही-टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा) या समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन, रायगड जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गिताचे प्रमाण घटत असल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेमध्ये ज्याप्रमाणे एचआयव्ही संसर्गित रुग्णसंख्या घटत आहे. त्याचप्रमाणे, एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत असल्याचे दिसून येत आहे. हे जिल्ह्यातील दिलासादायक चित्र आहे जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ४१ हजार ४३० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९ माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्या होत्या. या सर्व माता एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे, तर नोव्हेंबर, २०२० पर्यंत २५ हजार ७२९ गरोदर मातांची तपासणी झाली असून, त्यामध्ये अवघ्या २० माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या माता एआरटी उपचार घेत आहेत.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ठोकळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डापकू) संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. डॉ.चेतना पाटील, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्र-अलिबागचे डॉ.पांडुरंग शिंदे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित  होते.१५ बालकांची डीबीएस तपासणी२०२०-२१ मध्ये एकूण १५ बालकांची डीबीएस (ड्राय ब्लड स्पॉट) तपासणी करण्यात आली असून, १५ (१०० टक्के) बालके एचआयव्ही संसर्गित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ईएमटीसीटी कार्यक्रमांतर्गत मातेकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला १०० टक्के यश आले आहे, तसेच जिल्ह्यामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखान्यांमध्ये एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रात मोफत एचआयव्ही समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे.