शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

‘रायगड झेडपी पॅटर्न’ आता मुंबईत राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:03 IST

दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्था यशस्वी; रायगडमधून २०० व्हिलचेअर्स रवाना

- जयंत धुळप अलिबाग : आजवरच्या निवडणुकांत रायगड लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांचे असणारे अत्यल्प असे ८ ते ९ टक्के मतदान तब्बल २७.७१ टक्क्यांवर पोहोचवण्यात यशस्वी झालेला रायगड जिल्हा परिषदेचा दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्थेचा आगळा पॅटर्न राज्यात कीर्तिमान ठरला आहे. आता मुंबई शहरातील ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेचा हा पॅटर्न स्वीकारला आहे. मुंबईतील या दोन लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदान प्रक्रियेकरिता रायगडमधील चार तालुक्यांतून तब्बल २०० व्हिलचेअर्स शुक्रवारी मुंबईस रवाना होणार आहेत. २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदान प्रक्रियेत त्याचा उपयोग होणार असल्याची माहिती या ‘रायगड झेडपी पॅटर्न’चे निर्माते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदानासाठी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेस सहभागी करून घेण्याचा निर्णय रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यास रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी प्रतिसाद दिला. रायगडमधील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ७ हजार ३९४ दिव्यांग मतदारांना हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ न देता, त्यांचे मतदान सुलभतेने व्हावे याकरिता विशेष नियोजन केले. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींच्या अपंग कल्याण निधीमधून ८८६ व्हीलचेअर्स खरेदी केल्या. १५ तालुक्यांच्या १५ पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांकडे दिव्यांग मतदारास त्यांच्या घरून मतदान केंद्रांपर्यंत आणणे आणि गाडी केंद्रावर पोहोचल्यावर ग्रा.पं. कर्मचाºयाच्या मदतीने त्या दिव्यांग मतदारास व्हीलचेअर्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान केंद्रात नेण्यासाठी आणि मतदान झाल्यावर पुन्हा गाडीजवळ आणणे व घरपोच करणे अशी जबाबदारी सोपवली होती. सर्व विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाºयांनी आपल्यावर सोपवलेली ही जबाबदारी यशस्वी पार पडली.मुंबईला रायगडचे सहकार्यरायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्थेच्या पॅटर्नने दिव्यांग मतदान टक्केवारीत विक्रमी मतदान झाले आहे.मुंबईतदेखील दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदान प्रक्रियेकरिता हाच पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईत अपेक्षित असणाºया व्हीलचेअर्स भाडेतत्त्वावर उपलब्ध नाहीत.परिणामी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना विनंती केली असता, त्यांनी २०० व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत.परिणामी मुंबईतील ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना देखील आता सुलभतेने मतदान करणे शक्य होईल, अशी माहिती मुंबई शहर उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली आहे.रायगडमधील चार तालुक्यांतून तब्बल २०० व्हीलचेअर्स शुक्रवारी मुंबईस रवाना होत असून २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदान प्रक्रियेत सेवा देतील.-दिलीप हळदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019RaigadरायगडDivyangदिव्यांग