शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवामुळे रायगड जागतिक स्तरावर जाईल

By admin | Updated: January 5, 2016 02:03 IST

रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे.

अलिबाग : रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे. या कालावधीत पर्यटकांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी किल्ले रायगड येथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आम. भरतशेठ गोगावले, माजी आम. प्रवीण दरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, की या महोत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कार्यक्र मांच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. महोत्सवाला येणाऱ्या पयर्टकांच्या सोयीसाठी येथे वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होतील याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या परिसरात रस्त्यावर लाइट लावण्याचे काम करावे तसेच पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध करावे. अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवावी यासाठी आवश्यक असणारा पाणीसाठा ठेवावा. अपघात होऊ नये याची खबरदारी घ्यावी, रायगड महोत्सव काळात योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवावी, इतर संस्थांची मदत घेत असताना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा उपलब्ध झाली पाहिजे. तत्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात यावी, यासाठी डॉक्टारांचे पथक किल्ल्यावर, रोप-वेच्या ठिकाणी तसेच पायी जाणाऱ्या मार्गावर मध्यभागी ही यंत्रणा ठेवावी, अशा सूचना तावडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. (विशेष प्रतिनिधी)