शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रायगडला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:08 IST

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले

महाड : रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. रायगड संवर्धन प्रकल्प हे एक आव्हान म्हणून आपण स्वीकारले असून, रायगडला गतवैभव प्राप्त करून देण्यात आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने ६०० कोटी खर्चाचा रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, छत्रपती संभाजीराजे हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. रविवारी गडाला भेट दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज सदरेसमोरील बॅरिकेट्स काढण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाला दिले. त्यानुसार याबॅरिकेट काढून टाकण्यात आल्या. येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात रायगड संवर्धन प्रकल्पाच्या विविध कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.या रायगड संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून किल्ले रायगडवरील वास्तूंचे आहे त्याच स्वरूपात जतन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ध्वनी व्यवस्थेच्या माध्यमातून गडावरील वास्तूंचे शिवकालीन महत्त्व, गडावरील शिवकालीन प्रसंगांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. रायगड प्रदक्षिणा मार्गाचे मूळ नैसर्गिक आणि भौगोलिक स्वरूप आहे, तसेच ठेवून या मार्गावर माहिती केंद्र त्याचप्रमाणे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील जैवविविधतेची माहिती देण्याचाही आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.रायगड संवर्धन प्रकल्पात केवळ रायगड किल्ल्याचाच नव्हे, तर रायगड परिसरातील २९ गावांचाही समावेश करण्यात आला आहे. महाड रायगड मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असून, हा मार्ग दुपदरी करण्यात येणार आहे.या प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या विविध गावांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत स्थानिकांना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.