शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: March 25, 2017 01:32 IST

रायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फिल्टरेशन प्लॅन्ट बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना रायगड किल्ल्यावर येताना मिनरल वॉटरची बाटली घेऊन यावे लागणार नाही. पुरातत्त्व विभागाने विविध परवानग्यांबाबत सकारात्मकता दाखविल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी वर्षभरात लाखो पर्यटक येत असतात. धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांना खुणावत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने गड- किल्ले पाहण्याची पर्यटकांची फारच उत्सुकता असते. रायगड किल्ल्याच्या भ्रमंतीसाठी दिवसाला सुमारे दोन हजार पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सवासाठी लाखो शिवभक्त गडावर येतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले जिंकले अथवा उभारले त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. सुमारे साडेतीनशे वर्षांनंतर आजही तेथील पाण्याचे तलाव, विहीर जिवंतपणे अस्तित्वात आहेत. रायगड जिल्हा परिषदेने सुमारे ३० वर्षांपूर्वी रायगडावरील पाण्याचे नियोजन केले होते. पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन आजघडीला खराब झाल्या आहेत. त्यांचे मजबुतीकरण करणे गरजेचे होते. यासाठी रायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे.मुंबईतून दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे फाईलचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याबाबतच्या आवश्यक त्या बैठकाही पार पडल्या आहेत. त्यामुळे रायगडावर पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा ठरणारा अडसर आता दूर झाला आहे. पुरातत्त्व विभागाने विविध परवानग्यांना सकारात्मकता दाखविल्याने पाणीपुरवठा योजनेला बळ येणार असल्याचे चित्र दिसून येते.