शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: अखेर अलिबाग शहरात सिग्नलचे दिवे पेटले

By राजेश भोस्तेकर | Updated: December 29, 2022 19:19 IST

Raigad News: अलिबाग शहरात बंद असलेली सिग्नल यंत्रणा वर्षाच्या पूर्व संध्येला सुरू करून अलिबाग नगरपरिषदेने नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नव वर्षाला पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे.

- राजेश भोस्तेकरअलिबाग - अलिबाग शहरात बंद असलेली सिग्नल यंत्रणा वर्षाच्या पूर्व संध्येला सुरू करून अलिबाग नगरपरिषदेने नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नव वर्षाला पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना सिग्नलचे नियम पाळून वाहने चालवावी लागणार आहेत. अन्यथा पोलिसांकडून दंड कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

अलिबाग शहर हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. यासाठी अलिबाग नगरपरिषदेने महावीर चौक आणि अशोका कॉम्प्लेक्स या ठिकाणी पाच सहा वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र थोडेच दिवस ही यंत्रणा सुरू होती. त्यानंतर ती बंद अवस्थेत होती. सिग्नल यंत्रणेवर लाखोंचा खर्च केला होता. मात्र गेली पाच सहा वर्ष ही यंत्रणा बंद पडली होती. 

नव वर्षाला मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबाग मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेने बंद अवस्थेत असलेली महावीर चौकातील सिग्नल यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित केली आहे.  तर अशोका कॉम्प्लेक्स येथील यंत्रणा अद्याप बंद आहे. सिग्नल सुरू झाल्याने वाहन चालकांना शिस्त लागणार आहे. मात्र अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला उभी करणाऱ्या वाहनाचा प्रश्नही सुटणे आवश्यक आहे. अन्यथा सिग्नल सुरू होऊनही वाहतूक कोंडी समस्या मात्र जैसे थी राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड