शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी किशन जावळे

By निखिल म्हात्रे | Updated: July 12, 2024 23:15 IST

Raigad News: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग - राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे,जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी,अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच ग्रामपंचायत तसेच शहरांमध्ये योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी. संपूर्ण जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर, जिंगलद्वारे प्रचार व प्रसार करावा.प्रत्येक शनिवार चावडी वाचनचे आयोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड