शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

रायगड बाजारवरून वाद पेटला

By admin | Updated: December 7, 2015 01:18 IST

येथील रायगड बाजार इमारत बांधकाम सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शेकाप विरुध्द काँग्रेस आणि भाजपा असा राजकीय वाद पेटला आहे.

अलिबाग : येथील रायगड बाजार इमारत बांधकाम सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शेकाप विरुध्द काँग्रेस आणि भाजपा असा राजकीय वाद पेटला आहे. या प्रकरणी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्यास आणि श्रीबाग संस्थेला दिलेल्या परवानगीला आव्हान देण्यास नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने इमारतीच्या बांधकामाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना अलिबाग येथे रायगड बाजार उभारायचे आहे. अलिबाग नगर पालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. याच नगर पालिकेच्या ताब्यातील स.नं. ७ / २, सि.स.नं. १३२४ मधील १२४० चौ.मी. असणाऱ्या जमिनीवर श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लि. च्या माध्यमातून रायगड बाजार त्यांना उभारायचे आहे. या आधीचे बांधकाम बेकायदा असल्याने पाडले होते. आता रायगड बाजार नव्याने उभारण्यात येत आहे. आ. पाटील हे सत्तेच्या जोरावर कायदा धाब्यावर बसवित असल्याचे अलिबागचे काँग्रेसचे माजी आ. मधुकर ठाकूर आणि भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ठाकूर यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. इमारतीचे बांधकाम सीआरझेड-१मध्ये येत असून कांदळवनांची तोड करणे यासारखे अन्य महत्त्वाचे मुद्दे अ‍ॅड. मोहिते यांनी न्यायालयात मांडले आहेत. बांधकाम सीआरझेडमध्ये येते की नाही हे सक्षमपणे फक्त एमसीझेडएमए सांगू शकते. त्यामुळे त्यांना या प्रकरणात पार्टी करण्याची गरज न्यायालयाने मान्य करुन अ‍ॅड. मोहिते यांना कागदपत्रे सादर करण्यास तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. प्रकरण न्यायालयात सुरु असताना एमसीझेडएमएने त्यांना परवानगी देणे चुकीचे असून ७ आॅगस्ट २०१५ ला न्यायालयाने बांधकाम न करण्याचा दिलेला आदेश कायम असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)