शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी

By राजेश भोस्तेकर | Updated: July 20, 2023 10:47 IST

Raigad Irshalwadi Landslide: बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली

रायगड - जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आहे.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज  आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इरशाळगड ठाकूरवाडी याठिकाणी रात्रीपासून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य व मदतीचा ओघ चालू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रात्रीच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत साहित्य व पथके पाठवून कार्य सुरू मदत सुरुवात करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य , घटना स्थळी पोहचून मदत कार्य करण्यात येत आहे . 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती देत आहे. यावेळी शासकीय यंत्रणांबरोबरच दुर्घटना स्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे रात्री शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले .

घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन , मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांची भेट

भूस्ख्खलन झालेल्या इरशाळगड ठाकूरवाडी येथे मंत्री गिरीश महाजन , मंत्री उदय सामंत,  मंत्री दादाजी भुसे  यांची भेट देऊन आढावा घेतला. या अनुषंगाने मदत कार्याची  घेतली माहिती  घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात गुंतलेल्या यंत्रणा,  स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली , कर्जत , लोणावळा , बदलापूर , पनवेल ,वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ ॲम्बुलन्स, 44 अधिकारी कर्मचारी,2 जेसीबी पनवेल नगरपालिका येथून पाठविण्यात आले आहे. कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहे.दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र  सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंति हॅकर्स हे देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.उपचारांसाठी शासकीय रुग्णालय तसेच एमजीएम हॉस्पिटल येथे बेड तयार ठेवण्यात आले असून घटनास्थळावर पाणी बॉटल्स ,ब्लॅंकेट्स ,टॉर्च ,मदत साहित्य,  चादरी,  बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हा आरोग्य अधिकारी व विविध यंत्रणातील अधिकारी मदत करत सहभागी झाले आहेत. खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळवाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी करण्यात आली. दुर्गम भागातील वाडीत दुर्घटनेच्या पूर्वी साधारणत: २५ घरे व १५० लोक वस्ती होती. त्यापर्यंत त्यापैकी पाच जण दगावले असून अनेक व्यक्ती ढिगार्‍याखाली दबले असल्याचे संभावना आहे. पेक्षा अधिक वाडीतील काही मुले जागी होती. त्यांनी आपला जीव वाचवला व सदर घटना कळवली होती.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणEknath Shindeएकनाथ शिंदे