शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रायगड किल्ले अभ्यासक सुरेश वाडकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:21 IST

अल्प आजाराने मुंबई येथे घेतला अखेरचा श्वास 

लोकमत न्यूज नेटवर्क दासगाव : किल्ले रायगडावर एक हजार आठ वेळा जाण्याचा संकल्प करून रायगड परिसर आणि किल्ले रायगडाच्या विविध भागाची खडानखडा माहिती गोळा करण्याचे काम  करणारे  सुरेश वाडकर यांनी  शुक्रवारी अल्प आजाराने मुंबई येथे उपचार घेत असतानाच अखेरचा श्वास घेतला. 

किल्ले रायगड परिसरातील कोंझर हे त्यांचे जन्म गाव. मुंबई येथील कलरकेम कंपनीत काम करत असतानाच, त्यांची रायगड किल्ल्याशी मैत्री जडली. १९६७ पासून रायगड भ्रमंती आणि १९९० पासून त्यांनी डोंबिवली ते रायगड पायी प्रवास करत, किल्ले रायगड १,००८ वेळ सर करण्याचा संकल्प केला. आजवर त्यांनी ९९८ अभ्यासपूर्ण भेटी सफल केल्या आहेत. आपल्या रायगड भेटीत गेली ४० वर्षांत त्यांनी रायगड किल्ल्याचा परिपूर्ण अभ्यास करत, येथील वनस्पती, विषारी–बिनविषारी सर्प, पक्षी आदी घटकांचा अभ्यास केला. रायगडावर आढळणाऱ्या पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत, त्यांनी पक्ष्यांशीही मैत्री केली होती. आजवर त्यांनी सुमारे ४ लाख ५० हजार शिवप्रेमींना रायगड दर्शन घडविले आहे. महाराष्ट्रातील अपंग, अंध, मूकबधिर विद्यार्थ्यांना रायगड दाखविण्याचे काम सुरेश वाडकर यांनी केले आहे. ‘रायगड परिसर आणि निसर्ग’ या विषयावर आजपर्यंत जवळपास १,४७६ व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी देखील त्यांचा निकटचा संबंध होता. बाबासाहेब पुरंदरे यांना वाडकर गुरुस्थानी मानत होते. 

गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. उपचारानंतर ते पुन्हा सक्रिय झाले होते. दोन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने पुन्हा मुंबई येथे नेण्यात आले आणि त्या ठिकाणीच त्यांची प्राणज्योत मालवली.

रायगड दर्शन घडविलेसुरेश वाडकर यांना आजवर विक्रोळी येथील शौर्य पुरस्कार, परळ मधून अष्टगंध, डोंबिवली येथून चतुरंग, कोकणातून कोकणरत्न, आदी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, हवाई दल प्रमुख अनिल चिटणीस, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर देशमुख, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मानसिंगराव पवार आदि अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सुरेश वाडकर यांच्यासह रायगड दर्शन केले आहे.