शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सोनेरी, चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड; 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या ट्रॉफी छत्रपतींच्या चरणी

By राजेश भोस्तेकर | Updated: October 22, 2022 18:51 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली.

अलिबाग - जिद्द आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील  गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. १४० विक्रमी पदकांची कमाई करत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. यादरम्यान मिळालेल्या बहुमानाच्या ट्रॉफीला घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा घातला. युवा खेळाडूंच्या सोनेरी आणि चंदेरी यशाच्या या ट्रॉफीने किल्ले रायगडचा परिसर उजळून निघाला. ऑलम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी असा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपल्या खेळाडूंनी हे चषकरुपी धन शिवरायांच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने मानवंदना दिली. 

युवा खेळाडूंचे यश बहुमोल - शिरगावकर

अथक परिश्रम आणि प्रचंड जिद्दीच्या बळावर ग्रामीण भागातील युवा खेळाडूंनी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. सामन्या गणिक आपली चुणूक दाखवत खेळाडूंनी पदकावर नाव कोरले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक असे उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला. गुजरातच्या मैदानावर महाराष्ट्र संघाचा हा गौरव खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंसाठी बहुमोल ठरला आहे. पदकासाठी त्यांनी दिलेली झुंज ही राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे. याच पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे मोल जाणून आम्ही शिवरायांना चषकाच्या माध्यमातून मानवंदना दिली, अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

आपले खेळाडू हे देशात राज्याचे आणि जगात देशाचे नावलौकिक वाढवीत असतात. आजच्या या यशाने राज्यातल्या तमाम खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. पुढल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रच अव्वल स्थानी असेल,  ही खात्री आहे, असे शब्दात पथक प्रमुख प्रदीप गंधे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्रदीप गंधे,निलेश जगताप, अमित गायकवाड, राजेंद्र घुले,  शिवाजी साळुंखे, संदीप वांदळे, क्रीडा अधिकारी रायगड, शिवाजी कोळी- कुस्ती मार्गदर्शक व पदक विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड