शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा अव्वल

By admin | Updated: March 19, 2017 05:37 IST

जिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन

- जयंत धुळप,  अलिबागजिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन विकासकामे सुरू करण्यात अडचण येत होत्या; परंतु जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करून विकासकामे करण्याकरिता निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यानुसार नियोजित कालावधीत विकासकामांकरिता निधी खर्च करण्यात रायगड जिल्ह्याने संपूर्ण कोकणात प्रथम क्रमांक पटकावला आहे.कोकण महसूल विभागात निधी खर्च करण्यात रायगड प्रथम क्र मांकावर असून आतापर्यंत ६४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीचे वाटप येत्या १० दिवसांत करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विभागांतर्गत येणारा सर्व निधी यावर्षी खर्ची पडणार असून कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नसल्याचे विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन जिल्हा समितीमार्फत करून मोठ्या प्रमाणात विकास निधी वेगवेगळ्या विभागांना पुरविला जातो. रायगड जिल्ह्याची २०१६-१७ या आर्थिक वर्षाची तरतूद १६० कोटी रुपये आहे. यापैकी १५१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत त्यापैकी १०४ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एकूण ३५ विभागांना निधीचा पुरवठा केला जातो. त्यापैकी पशुसंवर्धन विभागाला ३ कोटी ७४ लाख रुपये, रस्त्यासाठी १८ कोटी, तर साकवांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. मत्स्य विभागाकरिता ४ कोटी ५५ लाख रुपये, वनविभागाकरिता १३ कोटी रुपये, जिल्हा उद्योग केंद्राकरिता ५४ लाख रुपये, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकरिता १ कोटी २० लाख रुपये, तर जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत नागरी सुविधांसाठी ७ कोटी रुपये, रायगड जिल्हा रुग्णालयाकरिता ७ कोटी रुपये, क्र ीडा विभाग १ कोटी ५४ लाख रुपये, तर अंगणवाडीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरविकास विभागासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले. वाटप झालेल्या १५१ कोटी रुपयांच्या निधी पैकी १०४ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीमध्ये ७५ कोटी, सिंधुदुर्गात ७१ कोटी, तर रायगडमध्ये १५१ कोटी खर्च कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १५८ कोटी रुपये असून आतापर्यंत ४८ टक्के म्हणजे ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १३० असून आतापर्यंत ५५ टक्के म्हणजे ७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रायगड मध्ये १५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण विभागात जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रथम ठरला आहे. त्यावर्षीचा विकास निधी त्याच नियोजित वर्षात खर्च करणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले सातत्याने सर्व विभागाचा वारंवार आढावा घेत आहेत. गेल्या वर्षी रायगडचा ९ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला नव्हता. परिणामी, तो आर्थिक वर्षअखेरीस शासनास समर्पित करावा लागला होता. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता दक्षता घेतली जात असल्याचे जाधव यांनी अखेरीस सांगितले.