शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 22:57 IST

मुलांची काळजी घेणे गरजेचे; झपाट्याने होतोय कोरोनाचा प्रसार

अलिबाग : रायगड जिल्ह्यात लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ ते २५ एप्रिल या कालावधीपर्यंत १ ते १८ वयोगटातील १ हजार ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेणे गरजेचे  आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ८३६ वर पोहोचली आहे, तर दोन हजार ८८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पनवेल, खालापूर, कर्जत, अलिबाग, पेण, माणगाव आणि महाड तालुक्यांत होणारी रुग्णवाढ चिंताजनक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी करोनाबाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुले आणि तरुणांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. 

 जिल्ह्यात १ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत १ ते १८ वयोगटातील एक हजार ६० हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आयसीएमआरच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फारसा त्रास जाणवला नव्हता. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये नगण्य होते.  मात्र, यावेळेस परिस्थिती वेगळी  आहे. लहानांमध्येही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यात कोरोनाची सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणेही  आढळून येत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.  

वयस्कर कोरोनाबाधितांसाठी आता उपचार पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ठराविक औषधांचा वापर केला जात आहे. मात्र, लहान मुलांच्या बाबतीत अशी उपचार पद्धती आखून देण्यात आलेली नाही. त्यांना लक्षणांवर आधारित औषधे दिली जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रोग प्रतिकारशक्ती लहान मुलांमध्ये चांगली असल्याने ही मुले कोरोनातून सहज बरे होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात.

सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी यासारखी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत, तर काही मुलांमध्ये कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. अशी मुले कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून काम करू शकतात, त्यामुळे अशा मुलांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना घरीच सुरक्षित आणि विलगीकरणात ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. बरेचदा लहान मुलांची कोविड टेस्ट करण्यास पालक फारसे इच्छुक नसतात. मात्र, ही बाब घरातील इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे दिसत असतील, डॉक्टरांनी कोविड चाचणी करण्याचे निर्देश दिले असतील, तर ही चाचणी लवकर करून घेणे आणि औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग