शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात महाश्रमदान, ६३४ ग्रामपंचायती : ११,६३३ नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:51 IST

‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला.

-आविष्कार देसाईअलिबाग : ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. स्वयंस्फूर्तीने ११ हजार ६३३ नागरिकांनी आपल्या हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.विविध पंचायतीमधील सुमारे सहा हजार ८४० कर्मचाऱ्यांनीही आपापल्या विभागाची स्वच्छता केली. मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आला. हे अभियान १२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीत येत्या काही दिवसांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.रायगड जिल्ह्याने आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध स्वच्छतेशी संबंधित अभियानात चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात आठवा तर कोकणामध्ये अव्वल स्थान पटाकवण्यामध्ये जिल्ह्याने बाजी मारली होती. हागणदारीमुक्तीमध्येही जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची सुरुवात केली आहे. २ आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग देणे अपेक्षित आहे.याच योजनेचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील तब्बल ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान दिन पाळण्यात आला. विशेष करुन मंगळवारी मोठ्या संख्येने ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तब्बल ११ हजार ६३३ नागरिकांना यामध्ये सहभाग घेत स्वत:च्या हातामध्ये झाडू घेत त्यांनी आपापल्या गावाची स्वच्छता केली. त्यांच्या जोडीला त्यात्या विभागातील सहा हजार ८४० कर्मचारीही मदतीला होते. स्वच्छता मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आल्याने पंचायती चकाचक झाल्या होत्या.नागरिकांमध्ये प्लॅस्टिकबंदीबाबत जागृतीअलिबाग शहरापासून जवळच असणाºया थळ ग्रामपंचायतीमध्येही ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, रविकिरण गायकवाड, सुनील माळी, सरपंच रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामसेवक ठाकूर यांच्यासह अन्य कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकरही बुधवारी होणाºया मोहिमेत सहभागी होणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले.सरकारने प्लॅस्टिकबंदी करण्याआधी सर्वत्र मोठ्या संख्येने कचºयामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या थाळ््या दिसून यायच्या मात्र आता त्यावर चाप बसला आहे. कचºयामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाल्याचे गोळा केलेल्या कचºयावरुन दिसून येत असल्याचा दावा पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे. नागरिकांमध्ये प्लॅस्टिकच्या वापराबाबत जागृती होत असल्याचे यावरुन दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या