शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक

By निखिल म्हात्रे | Updated: August 21, 2023 18:06 IST

Raigad: बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग - बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच बेकायदेशीरपणे रायगड जिल्ह्यात बस्तान मांडलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम ही सुरु केली आहे.

बांगलादेशी नागरिकांची धुसखोरी वाढल्यांने त्यांच्या शोधासाठी 2013 मध्ये बांगलादेशी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने रायगडमध्ये शोधकाम सुरु केले होते. शोध मोहीम सुरु शहानाबीबी जोहीद्दुल शेख मुळ राहणार बांग्लादेश या सध्या रा-गणेश नगर येथील अश्विनी चाळ येथे वास्तव्यास असल्याची माहीती पोलिसांना गोपनिय सुत्रांकडून मिळाली होती. बांगलादेशी नागरीक शहानाबीबी जोहीद्दूल शेख हिच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागपत्र पासपोर्ट, व्हिसा, किंवा भारत सरकाने अथवा भारतीय सिमेवरील नोंदणी अधिकाऱ्याने नेमुण दिलेल्या मार्गा व्यतीरीक्त भारत बांगलादेश सिमेवरून चोरटया मार्गाने घुसखोरी करून भारतीय सरहददीत प्रवेश करीत मागील 15 वर्षापासुन भारतामध्ये बनावट अधारकार्ड बनवुन अनधिकृतपणे वास्तव्य करीत होती. आरोपी शहानाबीबी जोहीद्दूल शेखला रविवारी  संध्याकाळी 6:17 वा च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 465, 468, परदेशी नागरीक अधिनियम, 1946 चे कलम 14 A, पारपत्र अधि 1950 चे कलम 3 अ, सह 6 अ, विदेशी व्यक्ती अधि 1948 चे कलम 3,1, अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि लांडे करीत आहेत . कारखान्यांमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे हे बांगलादेशी नागरिक काम मागण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात परराज्यातून येणार्‍या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळविण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मोहल्ला बैठका घेऊन अशा नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :ArrestअटकRaigadरायगड