शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 1:03 AM

बळीराजा आर्थिक संकटात; डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस!

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळा : दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार आगमन केले. सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. २०२० हे वर्ष आणखी काय काय दाखविणार आहे सांगता येत नाही. कोरोना महामारी, लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, जागतिक आर्थिक मंदी आणि आता डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस.सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नऊ-दहा वाजेपर्यंत पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने रब्बी हंगामातील कडधान्ये, वाल, मूग, मटकी, हरभरा, भाजीपाला, कलिंगड, आंबा, चिकू बागादेखील धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामधून आर्थिक हातभार लागेल या आशेवर बळीराजा होता. मात्र, आता या लहरी हवामान व अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरांसाठी (वैरणी) शेतात साठवून ठेवलेले गवत, पेंढ्याचे माच संपूर्ण भिजून ओलेचिंब झाले आहेत. गुरांना खायला काय? घालायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे बाजारात आलेले नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांसह शालेय विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.   हवामानामुळे आरोग्य धोक्यात येईल की काय? अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यांनी भरल्याने डबकी तयार झाली त्याचा वाहनचालकांना प्रवास करताना त्रास जाणवत होता. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी एमआयडीसी परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मुसळधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. डिसेंबर महिन्यात छत्री रेनकोटचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे अवेळी पाऊस पडत आहे.पडणाऱ्या पावसाने कडधान्याचे पीक धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातून कडधान्याची पिकेही जातील, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अवकाळी पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.