शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Raigad: ३०६१ मतदार घरूनच करणार मतदान, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा

By निखिल म्हात्रे | Updated: April 22, 2024 12:51 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यावर्षी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदानाची व्यवस्था केली असून रायगडमधून आतापर्यंत ३०६१ मतदारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३९ हजार ७४ इतके हे मतदार आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग - यावर्षी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरूनच मतदानाची व्यवस्था केली असून रायगडमधून आतापर्यंत ३०६१ मतदारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३९ हजार ७४ इतके हे मतदार आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३९ हजार ७४ एवढे वृद्ध आणि दिव्यांग मतदार आहेत. यापैकी अनेकांना मतदान केंद्रावर जात मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने ४० टक्क्यापेक्षा जास्त अंपगत्व असलेल्या दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी या मतदारांना फार्म १२ ड भरून नोंदणी करायची होती. रायगड मतदार संघातून आतापर्यंत तीन हजार ६१ मतदारांनी हा गृहमतदानाचा पर्याय स्वीकारला आहे.

अजूनही प्रक्रिया सुरूसध्या विधानसभा मतदारसंघनिहाय हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे, त्याचा आकडा ३० एप्रिलनंतर समजू शकेल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे होते गृहमतदानज्या मतदारांनी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडला त्यांची यादी तयार केली जाते. मतदानाला आठ दिवस शिल्लक असताना गृहमतदानाची प्रक्रिया सुरू होते. पोलिंग पथक संबंधित मतदाराच्या घरी पोहोचते. पोस्टल बॅलेट पेपरद्वारे अतिशय गोपनीय पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Raigadरायगडraigad-pcरायगड