शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:43 IST

पनवेलमध्ये नियमांचे उल्लंघन : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची धाड

पनवेल : खासगी कोविड रुग्णालयांच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारी वाढत असताना, शुक्रवारी, ७ आॅगस्टला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांनी अचानक पनवेल पालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांना भेटी देत रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. या भेटीत मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांची लूट सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दुपारी १२च्या दरम्यान पालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयांना डॉ.सुधाकर शिंदे यांनी भेटी दिल्या. मात्र, या भेटीदरम्यान एकाही रुग्णालयाने शासनाने ठरविलेल्या दरपत्रकानुसार उपचार केले नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोविड रुग्णांवर उपचार करीत असताना दरपत्रकाराची यादी रुग्णालयातील दर्शनीय भागात लावणे गरजेचे असताना, एकाही रुग्णालयाने ही यादी लावली नसल्याचे डॉ.सुधाकर शिंदे यांनी सांगितले.कळंबोलीमधील सुश्रुत कोविड १९ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलने ज्यादा दरपत्रकाची यादी रुग्णालयात लावल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी ही यादी काढून टाकण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या रुग्णालयांच्या माध्यमातून उपचाराच्या नावाने जादा बिल आकारले जात असल्याचे निदर्शनास आले असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले. राज्यभरात ज्यादा बिल आकारणी करणाºया खासगी कोविड रुग्णालयांना अचानक भेट देऊन आढावा घेत आहोत. पनवेलमधील भेट अशाच प्रकारची होती, असे शिंदे यांनी सांगितले.पनवेल पालिका हद्दीतील रु ग्णालयेपनवेल महानगरपालिका हद्दीत खारघरमधील पोलारिस हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, तर कळंबोलीमधील सुअस्था हॉस्पिटल, सत्यम हॉस्पिटल, सुश्रुत कोविड १९ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल या खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत.पनवेलमधील खासगी रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांकडून जादा बिल आकारला जात आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले आहेत, ते त्यांना परत करण्यासंदर्भात निर्णय या आॅडिट रिपोर्टनुसार घेण्यात येईल.- डॉ.सुधाकर शिंदे

टॅग्स :Raigadरायगड