विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्यात गावठी दारू व बेकायदा दारूविक्रीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत विविध ठिकाणी एकूण १५ छापे टाकून तब्बल ९१ हजार ६६७ रुपये किमतीची दारू जप्त केली. तर एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.महाड तालुक्यात नांगलवाडी गावच्या हद्दीत ४७ हजार ८२३ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, खालापूर तालुक्यात छोटे वेणगाव येथे २२ हजार ९५४ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, वनवठे गावच्या हद्दीत १५०० रुपये किमतीची गावठी दारू, साजगाव येथे ५३३३ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, नढाळ कातकरवाडी येथे २००० रुपयांची गावठी दारू, सोमजावाडी येथे २५५ रुपयांची गावठी दारू, खरसुंडी येथे १ हजार रुपये किमतीची गावठी दारू तर धारणे आदिवासीवाडी येथे २ हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली.श्रीवर्धन तालुक्यातील निगडीकाठी येथे ६६० रुपये किमतीची, पेण तालुक्यातील उर्णोली येथे ४४० रुपये किमतीची, तळा येथील कुंभटे आदिवासीवाडी येथे ४०५ रुपये किमतीची, पोलादपूर तालुक्यात संवाद येथे ८३२ रुपये किमतीची, अलिबाग येथील मांडवखार येथे ४०० रुपये किमतीची तर रेवसगाव येथे ५५२५ रुपये किमतीची, मुरुडमधील माजगाव येथे ६०० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.
दोन दिवसांत १५ ठिकाणी छापे
By admin | Updated: June 13, 2017 01:09 IST