शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील राेहा येथे सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद

By admin | Updated: June 28, 2017 14:40 IST

बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद राेहा येथे झाली आहे.

जयंत धुळप/ ऑनलाइन लाेकमत 
रायगड, दि. 28 - बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद राेहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी  पेण-८०.२०,  महाड-२९,  पाेलादपूर-२४,  पाली(सुधागड)-३५.६६,  खालापूर-७४,  कर्जत-७५.८०, अलिबाग-७४, तळा-८३,  माणगांव-३२, उरण-११६, म्हसळा-३५.६०, मुरुड -४७,  श्रीवर्धन-३०,  पनवेल-१२५ आणि गिरिस्थान माथेरान येथे १८५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान ७५.४५ मिमी आहे. 
 
जिल्ह्यातील मुख्य सहा नद्यांची पातळी नियंत्रणात
जिल्ह्यातील सहा महत्त्वाच्या नद्यांची पातळी नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात, कुंडलिका नदी क्षेत्रात काेलाड येथे ९२  मिमी पाऊस झाला असून २३.९५ मीटर धाेका पातळी असलेल्या कुंडलिका नदीची जलपातळी २२.६० मीटर आहे. अंबा नदी क्षेत्रात उन्हेरे(सुधागड) येथे ४६ मिमी पाऊस झाला असून ९ मीटर धाेका पातळी असलेल्या अंबा नदीची जलपातळी ६.५५ मीटर आहे. सावित्री नदी क्षेत्रात महाड येथे २९  मिमी पाऊस झाला असून ६.५० मीटर धाेका पातळी असलेल्या सावित्री  नदीची जलपातळी ३.३० मीटर आहे.
 
पाताळगंगा नदी क्षेत्रात खालापूर येथे ७४  मिमी पाऊस झाला असून २१.५२ मीटर धाेका पातळी असलेल्या पाताळगंगा नदीची जलपातळी १७.२० मीटर आहे. उल्हास नदी क्षेत्रात अवसरे येथे ७०  मिमी पाऊस झाला असून ४८.७० मीटर धाेका पातळी असलेल्या उल्हास नदीची जलपातळी ४४ मीटर आहे. गाढी नदी क्षेत्रात माेरबे  येथे ११०  मिमी पाऊस झाला असून ६.५५ मीटर धाेका पातळी असलेल्या गाढी नदीची जलपातळी २.७० मीटर आहे.
 
भीरा धरण क्षेत्रात २४ तासात १०३ मिमी पाऊस
भीरा धरण क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात १०३.४० मिमी पावसाची नाेंद झाली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान १ जून २०१७ पासून या धरण क्षेत्रात एकूण ९४०.२० मिमी पाऊस झाला असल्याने धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. ९.०९० दलघमी जलसंचय क्षमता असलेल्या भीरा धरणात, बुधवारी सकाळी जलपातळी ९४.२० मीटर झाली असून सद्यस्थितीत जलसाठा ५.१६ दलघमी आहे.