शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर घाटात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:17 IST

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.

- संदीप जाधवमहाड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.दापोलीच्या कोकण कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहलीसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी महाडजवळ घडलेल्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आठवणी रायगडवासीयांमध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेत निष्पाप ४० प्रवाशांचे बळी गेले होते. त्यावेळी तब्बल महिनाभर नदीपात्रात मृतदेहांची शोधमोहीम सुरू होती.मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते पुणे- बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील दहीवडी (राज्यमार्ग क्र . १३९) हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा समजला जातो. मात्र, घाटमार्गावर वारंवार घडणाºया अपघातांमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. पोलादपूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई ते दहीवडीपर्यंतच्या नव्वद किमी मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून त्याची युद्धपातळीवरून अंमलबजावणी होण्याची खरी गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. हा मार्ग अरुंद, धोकादायक, सुरक्षेचा दृष्टीने सोयीचा नसला तरी दुसरा योग्य पर्यायी मार्ग नसल्याने पर्यटक, तसेच महाड औद्योगिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातून येणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून एमआयडीसी परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाºया वाहनांचीही वर्दळ असते.पोलादपूर ते आंबेनळी हा (२४.२००) रस्ता सार्वजनिक बांधकाम, महाडच्या अखत्यारीत आहे तर त्यापुढील दहीवडीपर्यंतच्या मार्गाच्या देखभाल दुरु स्तीची जबाबदारी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. महाड विभागाने आपल्या अखत्यारीतील रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचे काम केले असले तरी अरु ंद मार्ग, तसेच धोकादायक वळणांमुळे हा घाटमार्ग प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे.या मार्गावर आंबेनळी घाटासह पाचगणी ते वाई मार्गावरील पसरणी घाट देखील वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पसरणी घाटातही वाहने दरीत कोसळण्याच्या दुर्घटना अनेकदा घडून प्रवाशांचे बळी गेले आहेत. मात्र, या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाहनांच्या अपघातांसह या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील पावसाळ्यात नियमितपणे घडतात, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अनेकदा बंद ठेवला जातो. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे या मार्गावर प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर तरी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वा सुरक्षिततेसाठी शासनाने जलदगतीने चालना द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड