शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रसंगामुळे रोह्यात आंदोलन, पोलिसांविरोधात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 05:30 IST

शुक्रवारी रोहेकरांनी पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केल्याने आठवड्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहा : रोहा-अष्टमी येथील एका १० वर्षीय गतिमंद मुलीवर ५५ प्रौढ वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत जाऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने रोहा-अष्टमीत प्रक्षोभ निर्माण झाला. शुक्रवारी रोहेकरांनी पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केल्याने आठवड्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेण येथून पोटापाण्यासाठी अष्टमी गावात हे कुटुंब आले. २८ फेब्रुवारीला निर्जन भागात या मुलीला बोलावून गावातील एका प्रौढ व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची घटना घडली. हे लक्षात येताच आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र संबंधित पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. मुलीच्या आईकडून हवे तसे पत्र लिहून घेतले गेले. तिची वैद्यकीय तपासणीही खासगी दवाखान्यात केली. मुलीला खूप वेदना होत असल्याचे आई सांगत असताना पोलिसांनी दुर्लक्ष केले. मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडून जाण्यासाठी त्यांना धमकावले गेले.>या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांच्या कसुरीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.- नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक>मुलगी गतिमंद असल्याने फायदा उठविण्यात आला. खासगी रुग्णालयातील महिला प्रसूती तज्ज्ञांनीही तपासणी अहवाल पोलिसांना वेळेत दिला नाही. अखेर या प्रकरणाला आठवड्यानंतर शुक्रवारी वाचा फुटली. रोहा पोलीस ठाण्यात सबंध अष्टमी-रोहेकर ग्रामस्थ संतप्त झाले. शहरातील सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, तरुणांनी शुक्रवारी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांवर दबाव वाढला. खाजगी डॉक्टरांनी उशिरा दिलेल्या रिपोर्टमध्येही धक्कादायक उल्लेख आले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनल कदम यांच्याकडे दिली. रोहा पोलिसांत आरोपीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.