शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

संरक्षक भिंतीस भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:14 IST

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत.

संतोष सापते  श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने थैमान घातले आहे. भरतीच्या वेळी लाटा रस्त्यावर उतरून अपघाताची शक्यता वेळास-आदगाव रस्त्यावर वाढली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. सर्वा, नानवेल व दिघीची वाहतूक या मार्गावरून होत असून लोकसंख्याही मोठी आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच वेळास व सर्वा येथील सर्व विद्यार्थी शाळेसाठी आदगाव विद्यालयात याच रस्त्याने जात असल्याने त्यांच्याही जीवास धोका आहे.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. वेळास या गावी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे. आदगावचा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे.तालुक्यातील लहान मच्छी विक्र ी करणारे आदगावमधून मासळी खरेदी करतात. त्यामुळे सदर मार्गावर सदैव वर्दळ असते.वेळास ते आदगाव ५ किलोमीटरचे अंतर आहे. रस्त्याच्या रु ंदीचा विचार करता अंदाजे १६ फूट रु ंदी आहे. तसेच दुतर्फा मातीची साइडपट्टी तीन तीन फूट आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूस आदगावचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तीन किलोमीटर अंतराच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात अनेक ठिकाणी सध्या मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संरक्षक भिंतीस सुद्धा तडे गेली आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना खड्ड्यांची कल्पना आहे, परंतु पर्यटकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागते.वेळास-आदगाव मार्गे सर्वा या मार्गावर एसटीच्या १२ फेºया नियमित चालतात. तसेच खाजगी वाहतूक करणाºया विक्र म रिक्षा आहेत. तसेच भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे वेळास-आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेले खड्डे लवकर भरण्यात यावे व समुद्राच्या संरक्षक भिंतीची दुरु स्ती लवकर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.