शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रायगडातील माता, बालकांना सुरक्षा कवच

By निखिल म्हात्रे | Updated: August 24, 2023 19:57 IST

या मोहिमेत 0 ते 5 वर्षांमधील 6185 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मिशन इंद्रधनुष्य 5.0 अंतर्गत झालेल्या लसीकरण मोहिमेची पहिली फेरी शंभर टक्के यशस्वी झाली आहे. या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरांमधून, तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने विविध आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षांमधील 6185 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‌‘मिशन इंद्रधनुष्य 5.0′ मोहीम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. या मोहिमेंतर्गत मिशन इंद्रधनुष्य मोहीम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय जंतुनाशक कार्यक्रम जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते.‌‘मिशन इंद्रधनुष्य 5.0′ अंतर्गत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमधून जिल्ह्यात 715 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. 0 ते एक वर्षामधील 3 हजार 817, एक ते दोन वर्षामधील एक हजार 236, दोन ते पाच वर्षाखालील एक हजार 132 बालके तसेच 270 गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले आहे. - डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजिप

टॅग्स :alibaugअलिबाग