शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्टील मार्केटच्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: July 12, 2015 22:29 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा समजला जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठा समजला जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार समितीने सुध्दा सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाहतुकीत जाणारा वेळ त्याचबरोबर व्यापारी व ग्राहकांची सोय व्हावी याकरिता दोन ते तीन ठिकाणी यार्ड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर कळंबोलीवरील भार कमी होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने त्या ठिकाणचा लोखंड- पोलाद बाजार कळंबोली येथे हलवला. येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. या बाजारात टाटा स्टील कंपनी, स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया, राष्ट्रीय पार्कनिगम या मोठ्या वखारी आहेत. महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रक आणि कंटेनर स्टील मार्केटमध्ये लोखंडाची ने-आण करण्याकरिता फेऱ्या मारतात. जेएनपीटी बंदरातूनही कळंबोलीतील लोखंड व्यापारी आयात-निर्यात करतात. उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यातून ये -जा करणाऱ्या वाहनांना मालाची चढ -उतार करण्याकरिता आजच्या घडीला कळंबोली गाठावी लागते. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ होते. विशेषत: मुंब्रा, मुंबई-गोवा व जेएनपीटी मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात घडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून कळंबोली स्टील मार्केटच्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. (वार्ताहर)