शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा ग्रामपंचायतींकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नाही - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:19 IST

जेएनपीटी बंदर उभारणीसाठी येथील ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच जेएनपीटी बंदर, बंदराच्या इमारती उभारल्या आहेत.

उरण : जेएनपीटी प्रकल्पबाधित आणि पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन ग्रामपंचायतींना महसुली गावाचा दर्जा दिलेला नसल्याने जेएनपीटीकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींना भविष्यात जेएनपीटीकडून थकीत मालमत्ता कराची रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.न्यायालयात बाजू मांडताना जेएनपीटीने बंदरामुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींना महसुली गावाचा दर्जा देण्यात आला नसल्याने मालमत्ता कर देता येणार नसल्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जेएनपीटीकडून तरी या ग्रामपंचायतींना भविष्यात मालमत्ता कर मिळणार नसल्याचे दिसते आहे.जेएनपीटी बंदर उभारणीसाठी येथील ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच जेएनपीटी बंदर, बंदराच्या इमारती उभारल्या आहेत. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामेही करण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मागील ३५ वर्षांपासून जेएनपीटीच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. निवेदने, चर्चा, बैठका, आंदोलने, जप्तीच्या कारवाईनंतरही जेएनपीटीने प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना दाद दिली नाही.त्यामुळे सर्वपक्षीय जेएनपीटी प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून जेएनपीटीच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली होती. शासनानेही समितीची बाजू ग्राह्य धरून ११ ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटी थकीत असलेल्या ९५ कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाचाही निर्णय अमान्य करीत जेएनपीटीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या कंपन्यांनी पत्रव्यवहार करावाहनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेअंतर्गत एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, जीटीआय, बीएमसीटीपीएल या खासगी बंदरांचा भूभागही येत नाही.तसेच या चारही खासगी बंदरांच्या धक्क्याला लागून असलेल्या जमिनीसंदर्भात उरणच्या भूमी अभिलेखामार्फत सर्वेक्षण केले जात आहे.त्यामुळे यापुढे मालमत्ता करासाठी जेएनपीटीने ३० वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या मेसर्स विराज एग्रो, मेसर्स गणेश बॅन्जोप्लास्ट, मेसर्स दीपक फर्टिलायझर या कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्याचीतंबीही जेएनपीटी प्रशासनाचे मुख्य व्यवस्थापक व सचिव जयंत ढवळे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींना लेखी पत्राद्वारे दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय