शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच प्रकल्पग्रस्तांची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:31 IST

आंदोलन : स्थानिक नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; ३५ वर्षे हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच

उरण : तब्बल वर्षे ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६) भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला.

२५६ घरांना लागलेल्या वाळवीमुळे फेर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना जेएनपीटीने पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार पायाभूत सोयी-सुविधांसह सुमारे १७ हेक्टर जागेच्या प्रस्तावावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम आहेत. यासाठी ग्रामस्थांचा जेएनपीटी, केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार संघर्ष सुरू आहे. उरण तहसीलदारांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पोहचविण्यात आला आहे.

दरम्यानच्या काळात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शिवसेनेच्या माध्यमातून हा विषय केंद्र सरकारकडे नेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार  श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चेच्या फेऱ्याही झडल्या. मात्र त्यातूनही आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी २१ जानेवारी  रोजी जेएनपीटी समुद्र चॅनेल बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

मात्र जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि डीसीपी शिवराज पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन  महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र महिनाभराच्या प्रतीक्षेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या १७ हेक्टर पुनर्वसन जागेचा प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार आणि जेएनपीटी अपयशी ठरले. त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पहाटे पासूनच जेएनपीटी विरोधात चॅनेल बंद आंदोलन सुरू  केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड