शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये आठ लाख गणेशमूर्तींची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:45 IST

गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सध्या घराघरांत गणेशमूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवला जात आहे.

जयंत धुळप।अलिबाग : गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सध्या घराघरांत गणेशमूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवला जात आहे. अमेरिका, दुबई, फ्रान्स आदी देशांतील गणेशोत्सवाकरिता सुमारे ४५ हजार गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांत इंदूर, हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद, जयपूर आदी ठिकाणी पोहोचण्याकरिता गणरायांचा प्रवास पेण येथून सुरू झाला आहे. पारंपरिक दोन हजार मूर्तिकार आणि ६ हजार कारागीर त्याचबरोबर घराघरांतील महिला आणि शालेय विद्यार्थी अशा तब्बल २५ ते ३० हजार जणांच्या हस्तकौशल्यातून यंदा ८ लाख गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यंदाची गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाची आर्थिक उलाढाल २५० कोटी रु पयांच्या घरात असल्याची माहिती पेणमधील नामांकित तिसºया पिढीचे गणेश मूर्तिकार आणि दीपक कला केंद्राचे संचालक दीपक समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पेणच्या गणेशमूर्तीची आखणी, रेखीवता आणि कलात्मक रंगकाम यातून मूर्तीमध्ये येणारा जिवंतपणा हा आगळावेगळा असतो. त्याच कारणास्तव येथील मूर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही सुप्रसिद्ध झाल्या आहेत. चार ते पाच पिढ्यांचे गणेश मूर्तिकार या व्यवसायात आहेत. वर्षभरातून केवळ दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, परंतु त्याच्या निर्मितीकरिता हे गणेशोत्सवाचेच केवळ दहा दिवस वगळता उर्वरित ३५५ दिवस हे सर्व मूर्तिकार आपापल्या कार्यशाळांमध्ये कार्यरत असतात. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मागणी असताना, पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण झाल्याने शाडूच्या मातीतून गणेशमूर्ती निर्मितीकडे वळण्याचा कलदेखील मूर्तिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.