शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिघी पोर्टला समस्यांचा विळखा; रस्ते, रोजगारनिर्मितीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:18 IST

दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे.

- श्रीकांत शेलारदांडगुरी : दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. परिणामी, डीबीएम जिओटेक्निकल अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने दिघी बंदर प्रशासनाविरोधात कंपनी लवादाकडे दाद मागितली आहे.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यामध्ये पाच वर्षांचा बांधकाम कालावधी धरून एकूण ५० वर्षांचा बीओटी करार करण्यात आला. करारानुसार १५०० कोटी रुपये खर्च करून, दिघी व आगरदांडा येथे लिक्विड कार्गो, बल्क कार्गो, एलएनजी टर्मिनल, कंटेनर टर्मिनल हे पाच वर्षांत बांधून कार्यान्वित करणे अपेक्षित होते; पण सुरुवातीला स्थानिक पातळीवर खाडीजवळील भराव, डोंगर फोडण्यामुळे घरांना हादरे बसणे, भूसंपादन, मच्छीमारांची जाळी बार्जेसमुळे फाटली जाणे, अशा अनेक कारणांमुळे प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे बंदराचे काम रखडले. त्यात भराव व उत्खनन करताना रॉयल्टी भरणे, पोर्ट विकासात स्थानिक ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगीबाबत मेरीटाइम बोर्ड व बंदरविकास मंत्रत्रालयाने स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने अडचणी आणखी वाढल्या. पोर्ट विकसित करताना पावसामुळे भराव वाहून जाणे, मातीची धूप रोखण्यासाठी तजवीज करणे, गाळ काढणे, यांसाठी वेळ व पैसा वाया गेला आहे.प्रकल्प राबवताना सुरुवातीला कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काही त्रुटी राहिल्या. दिघी येथील माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते, नैसर्गिक खोली होती, ब्रेकवॉटर वॉल न बांधताही मोठी जहाजे सहज हाताळली जात होती. यामुळेच कंत्राटदार विकासकाने दिघी टर्मिनलचा एक टप्पा सुरू करून म्हसळा व माणगाव शहर बायपास बांधून दिघी-माणगाव राज्यमार्ग (सध्या राष्ट्रीय महामार्ग)चे मजबुतीकरण केले असते, तर २४ तास मालाची हाताळणी होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वयित झाला असता, आणि पुढच्या टप्प्याकरिता आगरदांडा टर्मिनल विकासासाठी नियमित उत्पन्न सुरू झाले असते. कोकणातील खनिजे, पश्चिम महाराष्ट्रातला शेतमाल व उसाची मळी निर्यात करण्यासाठी दिघी पोर्ट ते पुणे हा महामार्ग नियोजित आहे. मात्र, रस्ते विकासासाठी निधी नसणे, शासनाची रॉयल्टी थकणे, अंतर्गत कंत्राटदारांची बिले थकणे, कर्मचाºयांचे पगारे थकवणे, करारात नमूद असताना गावाला अपुरा पाणीपुरवठा करणे, यातून वेळोवेळी ठेकेदार कंपनीची आर्थिक क्षमता कमजोर दिसून येते.दिघी पोर्ट संदर्भात कंपनी लवादाकडे असलेल्या प्रकरणाला तात्पुरती स्थगिती दिली.- विजय कलंत्री,विकासक, दिघी बंदर

टॅग्स :Raigadरायगड