शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By admin | Updated: April 18, 2017 06:47 IST

पाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले

जयंत धुळप, अलिबागपाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले. मात्र पाणीटंचाईमुक्त रायगडचे स्वप्न जिल्ह्यातील ३७ ते ४२ अं.से.च्या तापमानात यंदा पूर्णपणे विरून गेले आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईची झळ यंदा जिल्ह्यातील ३६७ गावे आणि १ हजार १०९ वाड्यांमधील ग्रामस्थांना बसणार आहे. जिल्ह्यातील या सर्व टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता तब्बल ६ कोटी २५ लाख १० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला खर्च करावे लागणार आहे. यंदाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३६७ गावांपैकी सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे तर टंचाईग्रस्त एकूण १ हजार १०९ वाड्यांपैकी सर्वाधिक २७२ वाड्या या एकट्या पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. पोलादपूरशेजारील महाड तालुक्यात ३६ गावे तर २२० वाड्या टंचाईग्रस्त आहेत. महाड-पोलादपूर बरोबरच कर्जत तालुक्यात देखील मोठे जलदुर्भिक्ष जाणवत असून या तालुक्यात ४४ गावे तर ३७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. एकेकाळी टंचाईमुक्त झालेल्या अलिबाग तालुक्यात देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १२ गावांबरोबरच ७१ वाड्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलदुर्भिक्ष यंदाही कायम असून, पेण तालुक्यातील १५४ वाड्यांबरोबरच ३९ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.१५ एप्रिल २०१७ रोजीच यंदा जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त १२ गावे आणि ७४ वाड्यांना १३ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. महाड तालुक्यातील २ गावे आणि ६ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यातील ४ गावे आणि २६ वाड्यांना प्रत्येकी तीन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ४ गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेलमधील दोन वाड्या, खालापूरमधील एक गाव व एक वाडी, रोहा तालुक्यातील एक वाडी तर श्रीवर्धनमधील दोन वाड्या यांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा देखील संकलित झाला, परंतु जिल्ह्यातील लक्षणीय तापमानामुळे तो जलसाठा पाणीटंचाई दूर करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ केवळ टँकर्स आणि विंधण विहिरींची पारंपरिक मात्रा देणे प्रशासनाच्या हाती राहिले आहे.