शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता गरीबांसाठीही खासगी शाळा खुल्या

By admin | Updated: January 23, 2017 05:38 IST

इंग्रजी, मराठी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी पनवेल तालुक्यात आॅनलाइन

अरूणकुमार मेहत्रे / कळंबोलीइंग्रजी, मराठी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी पनवेल तालुक्यात आॅनलाइन मोफत प्रवेश प्रक्रि या फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त जागा असल्याने पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत आता वंचित, आर्थिक दुर्बल घटक आणि अपंग विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के या प्रमाणात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील १६ खासगी शाळांमध्ये थेट प्रवेश मिळण्यास मोठी मदत होईल. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.पनवेल तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क अवाच्या सवा आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हते. ही बाब शासनाच्या समोर आल्यानंतर शासनाने ‘आरटीई’अंतर्गत वंचित घटक (एससी, एसटी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंगांसाठी अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. याबाबतची अंमलबजावणीची सक्ती बंधनकारक असली तरी अनेक शाळांकडून या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. आता शासनाने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरु वात केली आहे. पनवेल तालुका गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षापासून २५ टक्के प्रवेशप्रक्रि या आॅनलाइन करण्यात आली आहे. बहुतांशी नामांकित शाळेत मर्यादेपेक्षा अधिक प्रस्ताव येतात त्यामुळे ‘ड्रॉ’ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील बहुतांश खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेशप्रक्रि या सुरू झाली आहे. अशा शाळांनी २५ टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.