शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटक सुरक्षा व सुविधांना प्राधान्य, जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:17 IST

रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले.रायगड जिल्हा सागरतट व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल सागरतट अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. सागर तटावर पर्यटन सुविधा विकासासाठी जिल्ह्यातील नागाव-पिरवाडी (ता. उरण), अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, आवास, किहिम, आक्षी, नागाव, रेवदंडा, मुरुड तालुक्यांतील काशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगर व हरिहरेश्वर या गावांना निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावाही या वेळी घेण्यात आला. डॉ. सूर्यवंशी यांनी पर्यटकांना सुविधा देताना त्या त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असल्या पाहिजे याचा विचार व्हावा. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या गावांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी विविध विभागांनी समन्वयातून प्रस्ताव तयार करावे. गावातील अन्य विकासाची कामे रोहयोमधून करता येतील, तसेच शाश्वत समुद्र किनारा विकास व्यवस्थापनातून जिल्ह्यातील काशिद या समुद्र किनाºयाचा विकास करण्यात येत असून त्यास हे मानांकन मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच धर्तीवर वरसोली व किहिम या बीचेसचाही विकास करण्याबाबत उपाययोजना होत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, एशियन डेव्हल्पमेंट बँकेचे उपसंचालक व समन्वयक जितेंद्र रायसिंघानी, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी.एस. जैतू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच सर्व किनारा विकास अधिकारी आदी उपस्थित होते.हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावणाररायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच रस्त्यांच्या कामास वेगाने सुरु वात होईल. त्यामुळे चांगले दळणवळण उपलब्ध होईल. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावल्या जातील, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, टूर आॅपरेटर्स, पर्यटन केंद्र चालक आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बँकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, बंदर अधीक्षक अरविंद सोनवणे तसेच हॉटेल व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाºयांपुढे मांडल्या. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात सध्या केवळ शनिवार-रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांचा हा गट येत असतानाच अन्य प्रकारच्या पर्यटन संधींची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवून पर्यटकांचा अन्य प्रकारचा गट जो अधिक दिवस येथे वास्तव्य करेल, येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देईल, येथील समुद्र किनाºयांसोबतच पर्वत भ्रमंतीसही प्राधान्य देईल,अशा वेगवेगळ्या गटात पर्यटक येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी, स्थानिक लोकांचे सूक्ष्म कौशल्य विकास प्रशिक्षण, स्थानिकांच्या सहभागातून स्वच्छता व सुरक्षितता यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.