वावोशी : मद्यप्राशन करून अनेकांचा प्रवासाच्या दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने १ एप्रिलपासून खोपोली शहरात एक दारूचे दुकान वगळता सर्वच दारूची दुकाने बंद झाली आहेत. परंतु खोपोली शहरातील धनिया पॅलेस या बारमध्ये छुप्या पद्धतीने दारूची विक्र ी होत असल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली असता तत्काळ धाड टाकून दारूचा साठा जप्त करण्यात आला. बार मालकाला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले. सद्य परिस्थितीत बहुतांशी दारूची दुकाने हायवेच्या बाजूलाच असल्याचे निदर्शनास आल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात सर्वाधिक दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघाताचे प्रमाण असल्याने ही अपघाताची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय, राज्य मार्गावरील ५०० मी. अंतराच्या आतील दारु दुकाने खोपोली शहरातील जया बार वगळता बंद आहेत. (वार्ताहर)
खोपोलीत धनिया बारवर छापा
By admin | Updated: April 27, 2017 00:05 IST