शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताला आला सोन्याचा भाव; एका ट्राॅलीला चार हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:23 IST

रासायनिक खतांचाही भाव वाढला

- निखिल म्हात्रेअलिबाग : गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांकडून रासायनिक खताचा अमर्याद वापर झाला होता. यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेतीक्षेत्र क्षारपड बनले जात होते. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन गेल्या चार-पाच वर्षांपासून कसदार जमिनीचा पोत ढासळू नये यासाठी सेंद्रिय शेती पिकविण्यावर भर दिला आहे.गेल्या दोन वर्षांपासूनच या खताचे दर हे गगनाला भिडले आहेत. पाच वर्षांपूर्वी ३००-४०० रुपये बैलगाडी इतका दर असणारा सध्या हजारावर पोहोचल्याने गावांमधील शेतकऱ्यांना शेती पिकविणे अडचणीचे ठरू लागले आहे. रासायनिक खताचे दर परवडणारे नसल्याने व रासायनिक खतापासून मिळणाऱ्या लिंक जोड खताची बचत होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत शेणखताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. यंदा कृषी खात्याकडे उपलब्ध होणाऱ्या सबसिडीवरील सर्व प्रकारच्या खतांचाही शेतकऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळजवळ ५० टक्के शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताचा व विविध योजनांचा लाभ मिळवून घेतला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर लक्षात घेऊन शेतकऱ्याने कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताला सर्वाधिक पसंती दिली आहे.रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणामशेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापीक होण्याचा धोका संभवतो. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतांमुळे पाण्याचे स्रोतही दूषित होतात. जमिनीतील कस टिकवून  ठेवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंना मारक ठरतात. परिणामी, शेतीला नुकसान पोहोचते. शेणखताचा फायदाशेणखतामध्ये जमिनीला पूरक असे नत्र, स्फुरद, पलाश असते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. रासायनिक आणि शेणखतांचे दर रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एका ट्रॉलीच्या शेणखताचा दर हा एक हजार रुपये इतका असून, या ट्रॉलीमध्ये सर्वसाधारण तीन बैलगाड्या शेणखत बसते. त्यामुळे गाडीचा एक हजार रुपये इतका दर झाल्याने शेतकरी धायकुतीस आला आहे.