शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ‘पद्मदुर्ग जागर’ कार्यक्रम उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:16 IST

Murud : अभिषेक करण्यासाठी पुरोहित मंदार पेंडसे यांच्या मंत्रोपचाराने सारा परिसर भारावून गेला होता.

मुरुड : पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचा ‘पद्मदुर्ग जागर’ हा कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी शिवप्रेमींच्या मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संख्येची मर्यादा ठेवल्याने स्थानिक नागरिकांचा उत्साह मोठा दिसून आला. मुरुड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवरायांची पालखी विविध वाद्यांद्वारे बोटीमधून पद्मदुर्ग किल्ल्यावर नेण्यात आली. यावेळी कोटेश्वरी मातेचे मूळ स्थान असलेल्या जागी विधिवत कोटेश्वरी मातेचे पूजन करून महाराजांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्यासाठी पुरोहित मंदार पेंडसे यांच्या मंत्रोपचाराने सारा परिसर भारावून गेला होता.यावेळी खारआंबोली ग्रामस्थ मंडळातर्फे शिवकालीन मर्दानी खेळ तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठीचे खेळ उपस्थित शिवप्रेमींना पाहावयास मिळाली. महाराजांची पालखी गडावर फिरून प्रसादवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे अध्यक्ष अशीलकुमार ठाकूर, उपाध्यक्ष संकेत आरकशी, सहसचिव राहुल कासार, खजिनदार योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, महेश साळुंखे, अच्युत चव्हाण, रूपेश जामकर, सुनील शेळके, संतोष जंजीरकर व महिला मंडळ सर्व सभासद यांनी मोठी मेहनत घेत, हा कार्यक्रम यशस्वी केला.

‘इंग्रज, सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी किल्ला उभारला’

- महाराजांची आरती घेऊन प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी छत्रपतींनी १,६७५ साली पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यास सुरुवात केली होती. छत्रपतींच्या मृत्युनंतरही पदमदुर्ग हा स्वराजाचा एक भाग म्हणून सिद्धिसोबत लढत राहिला. 

-  १७१० साली हा पद्मदुर्ग किल्ल्यावर सिद्धीने ताबा मिळविला. आरमारी वर्चस्व राखण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली होती. इंग्रज व सिद्धीवर वचक राहावी यासाठी जलदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती, अशी माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड