शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तयारी अंतिम टप्प्यात : गोडवा वाढविण्यासाठी फराळ, मिठाई तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 02:59 IST

दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये फराळ, मिठाई अग्रक्रमांकावर असते. मिठाई आणि फराळ याशिवाय अन्य दुसरा पर्याय म्हणून चॉकलेटस् आणि सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहेत.

मुंबई  - दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये फराळ, मिठाई अग्रक्रमांकावर असते. मिठाई आणि फराळ याशिवाय अन्य दुसरा पर्याय म्हणून चॉकलेटस् आणि सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहेत. दिवाळीतील गोडवा वाढविण्यासाठी चॉकलेटस्च्या भेटवस्तूंची बरसात होत आहे. सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांतून चॉकलेटस्च्या भेटवस्तू मिळत आहेत. यासह सुकामेवा, बिस्किटची लज्जतदार भेट सहकाºयांना दिली जात असल्याचे चित्र तयार झाले आहे.दादर, गिरगाव, वरळी, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, मशीद बंदर येथील बाजारातील चॉकलेट आणि सुकामेव्यांची दुकाने अक्षरश: तुडुंब भरली आहेत. मिठाईला पर्याय आणि आरोग्यासाठी चांगले असल्याने सुकामेव्याची खरेदी केली जातआहे. नातलग, मित्रपरिवार यांना भेट म्हणून चॉकलेट आणि सुकामेव्याला पसंती मिळत आहे. अनेक दुकानांमध्ये विविध प्रकारच्या चॉकलेट व सुकामेव्याचे विविध आकारांतील बॉक्स ठेवण्यात आले आहेत. सणासुदीतील गोडवा वाढविणारी ही चॉकलेटस् खाण्याचा मोह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होतो. त्यामुळे विविध चॉकलेट्सच्या खरेदीसाठी व आरोग्यदायी सुकामेव्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे.चॉकलेटमध्ये सिल्क,डायफ्रूट, बबल्स् चॉकलेट, गोल्ड चॉकलेट, चॉकलेट विथ् बिस्किट या प्रकारांतील चॉकलेटस् आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सुकामेव्याच्या बॉक्समध्ये बदाम, काजू, आक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुके, खारीक समाविष्ट आहे.यंदा सुकामेव्याच्या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु त्याचा परिणाम ग्राहकांच्या गर्दीवर पडलेला नाही. ग्राहक या बॉक्सकडे आकर्षित होऊन आपल्या पसंतीप्रमाणे गिफ्टची खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.पदार्थावरून ठरते बॉक्सची किंमतसुक्यामेव्याच्या बॉक्सची किंमत आकारावरून आणि त्यात असलेल्या पदार्थांवरून ठरत आहे. चार सुक्यामेव्याचे पदार्थ असलेले गिफ्ट बॉक्स ३०० ते ५०० रुपये; तसेच सहा ते आठ सुक्यामेवाचे पदार्थ असलेले गिफ्ट बॉक्स ५०० ते २ हजारांपर्यंत मिळत आहेत.ग्राहकांसाठी आकर्षक पॅकिंगदेशातील ब्रॅण्डेड कंपनीचे चॉकलेट बॉक्स बाजारात आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डसह हॅण्डमेड चॉकलेटचे बॉक्स उपलब्ध आहेत. दिवाळीनिमित्त अनेक चॉकलेट कंपन्यांनी आकर्षक पॅकिंग करून ग्राहकांसाठी गिफ्ट बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत.बिस्किटे, नानखटाई, खारी बिस्किटेगोड बिस्किटे, नानकटाई, खारी बिस्किटे यांचीदेखील सजविलेल्या बॉक्समधून विक्री केली जात आहे. छोट्या आकाराच्या बॉक्सची किंमत १०० ते २०० रुपये असून, मोठ्या बॉक्सची किंमत ५०० ते १ हजारपर्यंत आहे.भाऊबीजेची भेट : भाऊबीजेसाठी भाऊ बहिणीना गोड भेट म्हणून चॉकलेट गिफ्ट बॉक्स देऊ शकतो. त्यासाठी अनेक ग्राहकांनी एक किलो, अर्धा किलोचे चॉकलेट गिफ्ट बॉक्सची आॅर्डर दिली असल्याचे विवेक शर्मा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी