शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रंगल्या क्रिकेट व कबड्डीच्या प्रीमियर लीग

By निखिल म्हात्रे | Updated: January 28, 2024 19:07 IST

प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - रायगड जिल्हा कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. या मातीत असंख्य मातब्बर कबड्डीपटू उदयाला आले आहेत. याबरोबर येथील लहानग्यांसह मोठ्यांना देखील क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कबड्डी व क्रिकेटच्या स्पर्धा बंद असल्याने खेळाडू व क्रीडा रसिकांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र आता हिवाळ्याच्या हंगामात सध्या जिल्ह्यातील गावागावात अगदी गल्लीबोळात देखील क्रिकेट आणि कबड्डीच्या प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत. येथे हजारो व लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. शिवाय मोठ्या चषकांना देखील अधिक मागणी आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमी व रसिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. शिवाय यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना व गती देखील मिळत आहे.

या प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत. गावातील सरपंच ते मोठा नेता व पुढारी यासाठी बक्षिसांची रक्कम किंवा पूर्ण स्पर्धेचे आयोजन करतात. काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देखील प्रीमियर लीग भरविण्यात येते. एकूणच या स्पर्धांमुळे गाव खेड्यातील प्रतिभावंत व होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व जोडीला थोडेफार आर्थिक पाठबळ देखील मिळत आहेत. गावागावातील मैदाने किंवा शेतात या स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी मंडप बांधले जातात. सोबत डीजे देखील लावला जातो. चांगले निवेदक बोलविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच यासाठी नेमले जातात. एकूणच सर्व कार्यक्रम भारदस्त केले जात आहेत. या लोकांना देखील रोजगाराची संधी मिळत आहे. तसेच यावेळी मंडप व डेकोरेशन वाले, वडापाव वाले, सरबत, पाणीवाले आदी व्यावसाईक व विक्रेत्यांना देखील चांगला धंदा मिळतो. आयोजकांच्या नावाचे व लोगो असलेले विविध टी शर्ट छपाई केली जाते. चषक विक्रेत्यांचा देखील चांगला व्यवसाय होत आहे. एकूणच या प्रीमियर लिगमुळे जणूकाही गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला उभारी आणि चालना सुद्धा मिळत आहे. तसेच पुढारी व नेते यांच्यामध्ये राजकारण व चढाओढ देखील रंगलेले पहायला मिळते.

मोठ्या चषकांना मागणी -जिल्ह्यात सध्या मोठ्या चषकांना मागणी वाढली आहे. प्रीमियर लीगच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील भव्य चषकाचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. अगदी कमी रकमेच्या स्पर्धेत सुद्धा भव्य चषक पहायला मिळतो. परिणामी चषक विक्रेते देखील सुखावले आहेत.