शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गर्भवती महिला मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:53 IST

ग्रामीण भागात अडचणी; सुधागड आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष

- विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यात बहुतांश गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावयाचे असते, विवाहितेच्या माहेरच्या आणि सासरच्या नावातील तफावत, आधार लिंक, बँक खात्यात पैसे जमा न होणे, जमा झालेल्या खात्याचा कुठलाही तपशील नसणे, जन्माचा दाखला, नोंदणी क्रमांक अशा अनेक अडचणी योजनेचा लाभ घेताना येत आहेत. तालुक्यातील मंगल दीपक कुंभार यांनी दीड वर्षांपूर्वी या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून अर्ज केला होता. त्यांच्या खात्यात आरोग्य विभागाकडून पैसे वर्ग झाल्याचे दाखविले जाते. मात्र, त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याचे कुंभार यांनी सांगीतले.आरोग्य विभागातून कुठलाही तपशील मिळत नसल्याने अनेक लाभार्थी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून वैतागले आहेत. सुधागड तालुक्यात प्रधामंत्री मातृवंदना योजनेंतर्गत १ एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १९७ महिलांची नोंद झाली आहे. १४४ महिलांना ५ हजार प्रमाणे ७ लाख २० हजार रुपयांचा लाभ लवकरच मिळणार आहे. तर ५३ महिलांसाठी लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिली.गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या दरात घट व्हावी, यासाठी राज्य सरकारद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते.प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला एक हजार रुपयांचा हप्ता, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर दिला जातो. दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर व गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हेपेटायटिस बी यांसारख्या लसीकरणाचा पहिले खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. शासनाची ही योजना महिलांसाठी उपयुक्त असली, तरी ती राबविण्यासाठी व लाभार्थींपर्यंत याबाबत माहिती पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.सुधागडमध्ये मातृवंदना योजनेंतर्गत १ एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १९७ महिलांची नोंद झाली आहे. १४४ महिलांना ५ हजार प्रमाणे ७ लाख २० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला हप्ता एक हजारांचा आहे.तीन टप्प्यांत हे अनुदान मिळते. ज्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली नाही, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही इथून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवित नाही. ते पैसे वरिष्ठ स्तरवरून लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात. आम्ही फक्त लाभार्थ्यांची माहिती देतो. याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील, तर त्या सोडविल्या जातील. ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा करू.- शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाHealthआरोग्य