शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी गरोदर मातेला गमवावे लागले बाळ; रायगड जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही

By राजेश भोस्तेकर | Updated: March 24, 2023 06:21 IST

सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत. 

- राजेश भोस्तेकर

अलिबाग : जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका आदिवासी मातेला आपल्या बाळाला गमवावे लागल्याची घटना घडली आहे. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या रायगड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टर जॉयती पांजा या एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ असून, सलग काम केल्यामुळे गुरुवारी त्या  आल्या नव्हत्या. त्यामुळे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे हे उपचार करत आहेत. पेण तालुक्यातील दुष्मिखार पाडा येथील आदिवासी वाडी येथील जागृती सुनील कातकरी ही आठ महिन्यांची गरोदर माता बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्रसूती कक्षात दाखल झाली होती. महिलेचा जीव वाचविणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. अखेर लोकमतच्या प्रतिनिधीने रुग्णालयाचे निवृत्त स्रीरोग तज्ज्ञ डॉ. फुटाणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी या महिलेवरील उपचाराची जबाबदारी घेतली.  

डॉ. भाग्यरेखा पाटील, (पोलादपूर) डॉ. स्वाती नाईक, (पनवेल), डॉ. प्रियांका म्हात्रे (पनवेल), धनंजय शिंदे (माणगाव) हे स्त्रीरोग तज्ज्ञ बऱ्याच काळापासून गैरहजर आहेत. त्यांना नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली. तर मेडिकल कॉलेजला रुजू झालेले डॉक्टर हे रुग्णालयातही सुविधा देत आहेत. आमच्यापरीने आम्ही जसे डॉक्टर उपलब्ध होतील तशी मदत करीत आहोत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही ही वस्तुस्थिती आहे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर सध्या उपचार करीत आहेत. डॉक्टरांची भरती करावी याबाबत शासनाकडे मागणी केली आहे.         - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

महिलेचे बाळ पोटात दगावले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी नॉर्मल डिलिव्हरी करू अन्यथा सिझर करावे लागेल.- डॉ. अनिल फुटाणे, स्त्रीरोग तज्ज्ञ

टॅग्स :Raigadरायगडdoctorडॉक्टर