शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य- पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे

By वैभव गायकर | Updated: June 7, 2024 17:45 IST

नवनियुक्त आयुक्तांनी शनिवारी स्वीकारला पनवेल महानगर पालिकेचा पदभार

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असुन पनवेल महानगरपालिकेला सर्वोच्च स्थापनावर पोहचविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज केले. पनवेल महानगर पालिकेची सूत्रे चितळे यांनी आज हाती घेतली.

लोकसभेच्या निवडणुकांच्या प्राश्वभूमीवर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या बदली नंतर रिक्त असलेल्या आयुक्तपदी अखेर मंगेश चितळे यांची नियुक्ती करण्यात आली. मागील काही काळापासून पनवेलचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे होती. त्यांनी यशस्वीपणे आयुक्तपदाचा कारभार हाकल्यानंतर आयुक्तपदी चितळे यांची वर्णी लागल्यानंतर रसाळ यांनी आयुक्तपदाचा कारभार चितळे कडे सुपूर्द केला. कल्याण-डोंबिवलीच्या अतिरिक्त पदावरती कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न व रस्ते क्राँकीटीकरण, उद्यानांचे सुशोभिकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांनी भर दिला होता. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे. त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगरविकास विभाग, पुणे पालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

महानगरपालिका क्षेत्रामधील  नागरी सुविधा अंतर्गत २९ गावांमधील स्मार्टसिटी अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली  झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण, पनवेल महापालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम करण्यास प्राधान्य असणार आहे. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देणार असून पालिकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर भर दिला जाईल.पनवेलला सर्वोच्च स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.-मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलPanvel Municipal Corporation 2022पनवेल महानगरपालिका निवडणुक 2022commissionerआयुक्त