शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७० हजार जनावरांचे पावसाळापूर्व लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2023 13:11 IST

रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते.

अलिबाग : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांमुळे पशुधनाची हानी होते. त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी- मेंढ्या आदी ७० हजार १६६ जनावरांचे लसीकरण करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे.रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते. या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार होतात. यामुळे गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या पशू व पक्षांना घटसर्प, फन्या, आंत्रविषारसारखे रोग होतात. ताप येणे, श्वसननलिका सूजणे, नाकातून चिकट स्राव येणे ही घटसर्प आजाराची लक्षणे आहेत, या आजारावर वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होतो. या रोगामुळे जनावरांमधील प्रतिकारशक्ती कमी होते. उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभरापासून प्रत्येक तालुक्यात या लसीचे वितरण केले आहे. यातून आतापर्यंत ७० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. 

अशी घ्या जनावरांची काळजी    रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना योग्य असा पोषक आहार म्हणजेच क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे.    लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनाशक औषध द्यावे, तर लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत.     गाभण जनावरांना लस टोचू नये. लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी.    लसीकरण से नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच माणजेच सकाळी किंवा संध्याकाळी करावे.     लस टोचलेल्या जागी कोणत्याही जंतुनाशकाचा वापर करू नये. 

टॅग्स :Raigadरायगड