शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

३५९ मशालींनी उजळला प्रतापगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:59 IST

इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर मंगळवारी रात्री ३५९ मशालींनी उजळून निघाला.

पोलादपूर : इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर मंगळवारी रात्री ३५९ मशालींनी उजळून निघाला. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सावातील चतुर्थी दिवशी ३५९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन हस्तकला केंद्राचे प्रमुख चंद्रकांत उतेकर यांनी केले होते. गेल्या नऊ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यंदा या उत्सवाचे दहावे वर्ष आहे. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाºया शालिग्राम दगडापासून भवानीमातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविल्या, तेव्हापासून नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली.यंदा भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला ३५९ वर्षे पूर्ण झाल्याने किल्ल्यावर भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री ८ वाजता भवानीमातेच्या मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मशाल महोत्सव सुरू करण्यात आला. या वेळी महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, संजय कचरे आदी उपस्थित होते. मंदिर परिसरापासून शिवप्रताप बुरुजापर्यंत ३५९ मशाली पेटविण्यात आल्या. दीपोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :Raigadरायगड