पाली : पालीत विजेचा खेळखंडोबा झाला असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. वाजरोली व आंबा नदीजवळ विद्युतवाहिनी तुटल्यामुळे पालीसह बाजूच्या परिसरातील वीज आठ ते दहा तास गुल होती. उष्म्याने सर्व नागरिक हैराण झाले होते. वाजरोली येथे तुटलेली वीजवाहिनी दुरु स्तीसाठी रात्री १२ वाजले. त्यानंतर पुन्हा पहाटे पाचच्या सुमारास आंबा नदीजवळ एक विद्युतवाहिनी तुटली. तुटलेल्या वाहिनीजवळ लोकवस्ती नसल्याने तिचा शोध घेण्यास वेळ गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी साडेदहा वाजता वीजपुरवठा सुरु करण्यात आला.वीज वितरणच्या हालगर्जीपणामुळेच सुधागडवासीयांना या वीज समस्यांना तोड द्यावं लागत आहे. (वार्ताहर) ज्या ठिकाणी या वाहिन्या तुटल्या होत्या तो भाग झाडाझुडपांचा असल्याने दुरु स्तीसाठी वेळ लागला. वाहिन्यांचे इन्सुलेटर मातीचे बनविलेले असतात. प्रखर उन्हामुळे त्यांना बारीक चिरा पडतात. पावसाचे पाणी त्यात गेल्यास ते तुटून पडतात. परिणामी त्याला जोडलेल्या वाहिन्या तुटतात. - बी. एस . देसाई, प्रभारी उप कार्यकारी अभियंता
पालीत विजेचा खेळखंडोबा
By admin | Updated: May 29, 2016 03:03 IST