शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्री व्यावसायिकांनो, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:32 IST

पाली तहसील कार्यालयात बैठक: उपाययोजना करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क पाली : पाली तहसील कार्यालयात सुधागड तालुक्यातील सर्व पोल्ट्री चालक व मालक यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी संपन्न झाली. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी बर्ड फ्लू व त्यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची शास्त्रोक्त माहिती दिली. खबरदारी व उपाययोजना करण्याचे आवाहन बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर केले.पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा, व्यावसायिकांना यासंदर्भात शास्त्रोक्त माहिती व उपाययोजना कळाव्यात आणि त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने या बैठकीचे आयोजन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले होते.जिल्हा व तालुका प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली. तसेच काही दिवसांत तालुक्यातील चिकन विक्रेत्यांची देखील अशाच स्वरूपाची बैठक आयोजित करणार असल्याचे रायन्नावार यांनी सांगितले. यावेळी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. पोल्ट्री व्यवसायाला बर्ड फ्लूचा जास्त धोका नाही. मात्र, तरीही पोल्ट्री व्यावसायिकांनी व तेथे काम करणाऱ्यांनी हातात ग्लोव्हज न घालता मृत पक्ष्यांना स्पर्श करणे टाळा. हात वारंवार धुतले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. पोल्ट्री शेडवर बाहेरील गाडी किंवा माणसे येण्यास मनाई करावी, असे सांगितले.

आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. कुक्कुटपालकांनी शेड व परिसर सोडिअम हायपोक्लोराइड, चुना लावून निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी. अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरण्याची सवय लावा. पशुसंवर्धन विभागाकडून योग्य उपाययोजना व तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे कोकरे म्हणाले. बैठकीस तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

 

टॅग्स :pali-pcपालीBird Fluबर्ड फ्लू