शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 19:05 IST

या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

मधुकर ठाकूर 

उरण : मागील महिन्यातच मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या चिर्ले-दास्तान उड्डाण पुलावर महिन्याभरातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका  करणारा उरण पुर्व विभागातील नागरिकांसाठी हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेल आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पुर्व भागातील नागरिकांना सोयीचा आहे.त्याशिवाय २० मिनिटांच्या अंतराने  जेएनपीए बंदरातुन धावणाऱ्या मालगाड्यांमुळे रेल्वे फाटक बंद करण्यात येत होते.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता.या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चिर्ले ते दास्तान पर्यंत दिड किमी लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे खाडी पुल विभागातर्फे हे काम करण्यात आले आहे.हा उड्डाणपूल उभारण्यावर सुमारे ४७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या  बांधकाम मंत्र्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांनी यावेळी ठेकेदाराच्या कामाबाबत चांगलीच स्तुती सुमने उधळण्यात आली होती. मात्र महिनाभरातच या पुलाला खड्डे पडू लागल्यामुळे कामाच्या दर्जा बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. अगोदरच या पुलाच्या रस्त्याची कुठेही लेव्हल नाही. त्यामुळे या पुलावर  खड्डे पडले आहेत. तसेच याआधी गर्डर उचलून बसवतानाही कोसळला होता. या उड्डाणपूलाच्या देखभाल, दुरूस्तीचा कालावधी १० वर्षाचा असल्याने जर पुलाच्या कामाला काही झाले तर ठेकेदाराकडून तो दुरूस्त करून घेण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण